रामदास पठाराजवळ सुंदरमठ...
अन वरंध-कुंभारकोंडजवळ सापडली स्वयंभू शिवथरघळ;
देशो-देशीच्या रामदासींसाठी सदगुरु अरविंदनाथ महाराजांची नववर्षभेट
समर्थ रामदास स्वामींनी येथे बसून सर्व ग्रंथादी लेखन श्री कल्याण स्वामींकडून करविले
गुगल अर्थद्वारे घेतलेले स्वयंभू शिवथरघळीचे सेटेलाईट छायाचित्र
स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी॥
'ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा माहानदी। जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥'
अन वरंध-कुंभारकोंडजवळ सापडली स्वयंभू शिवथरघळ;
देशो-देशीच्या रामदासींसाठी सदगुरु अरविंदनाथ महाराजांची नववर्षभेट
समर्थ रामदास स्वामींनी येथे बसून सर्व ग्रंथादी लेखन श्री कल्याण स्वामींकडून करविले
गुगल अर्थद्वारे घेतलेले स्वयंभू शिवथरघळीचे सेटेलाईट छायाचित्र
स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी॥
'ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा माहानदी। जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥'
या स्वयंभू शिवथरघळी बाहेर असलेला धबधबा रामगंगा
हि गोविंदमाची जेथून बोललेले थेट स्वयंभू शिवथरघळीमध्ये ऐकू येते.
स्वयंभू शिवथरघळीबाहेर सदगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज आणि समर्थ सेवक
स्वयंभू शिवथरघळीचे हे दुरून दर्शन
स्वयंभू शिवथरघळीचे आणि सुंदर मठाचे सात बारा महसुली उतारे
सुंदरमठालगतच्या विहिरीजवळ गुरांसाठी पाणपोई
सुंदरमठातील हाच तो चौथरा जेथे समर्थांनी पहिल्या सिंदूरवर्णी गणेशमूर्तीचे अर्चन केले.
कल्याणस्वामी आणि समर्थांनी सिंदूरवर्णी गणेशमूर्तीचि अर्चना केल्याचे हेच ते दृश्य
स्वानंद सदगुरु स्वामी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या
समर्थ मठाची जागा आहे मुळचा सुंदरमठ
हि गोविंदमाची जेथून बोललेले थेट स्वयंभू शिवथरघळीमध्ये ऐकू येते.
स्वयंभू शिवथरघळीबाहेर सदगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज आणि समर्थ सेवक
स्वयंभू शिवथरघळीचे हे दुरून दर्शन
स्वयंभू शिवथरघळीचे आणि सुंदर मठाचे सात बारा महसुली उतारे
सुंदरमठालगतच्या विहिरीजवळ गुरांसाठी पाणपोई
सुंदरमठातील हाच तो चौथरा जेथे समर्थांनी पहिल्या सिंदूरवर्णी गणेशमूर्तीचे अर्चन केले.
कल्याणस्वामी आणि समर्थांनी सिंदूरवर्णी गणेशमूर्तीचि अर्चना केल्याचे हेच ते दृश्य
स्वानंद सदगुरु स्वामी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या
समर्थ मठाची जागा आहे मुळचा सुंदरमठ
सकळ देवांचिये साक्षी।गुप्त उदंड भूवने।
सौख्यासि पावणे जाणे। आनंदवनभुवनी॥'
समर्थ रामदास स्वामींची असंख्य गुप्त भुवने असताना त्यांनी श्रीसमर्थ दासबोधादी ग्रंथांची निर्मिती केली ती शिवथरप्रांतातील घळ सध्या अस्तित्वात असलेली आहे अथवा कोणती? याबाबत संशोधन करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी
सौख्यासि पावणे जाणे। आनंदवनभुवनी॥'
समर्थ रामदास स्वामींची असंख्य गुप्त भुवने असताना त्यांनी श्रीसमर्थ दासबोधादी ग्रंथांची निर्मिती केली ती शिवथरप्रांतातील घळ सध्या अस्तित्वात असलेली आहे अथवा कोणती? याबाबत संशोधन करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी
'वेदशास्त्र धर्मचर्चा। पुराणे माहात्मे किती।
कवित्व नूतने जीर्णे। आनंदवनभुवनी॥'
या समर्थ रामदासस्वामी लिखित 'आनंदवनभुवनी' कवनामध्ये दिलेल्या वर्णनांनुसार दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे ठिकाण शोधून काढले असून महाड-भोर रस्त्यापासून जवळच रामदासपठारजवळ सुंदरमठ आणि वरंध कुंभारकोंड येथे स्वयंभू शिवथर घळ शोधून काढली आहे. हे दोन्ही शोध दि.०१/०१/२०११ रोजी आध्यात्मिक जगतातील तमाम रामदासींसाठी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी नववर्षभेट असल्याचे सांगितले आहे.
स्वयंभू शिवथरघळ
स्वयंभू शिवथरघळ
तब्बल शंभर वर्षांपूर्वी सन १९१० मध्ये समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्यामते सध्या अस्तित्वात व सर्वशृत असलेली शिवथर घळ शोधून काढण्यात आली. मात्र, दासबोधादी ग्रंथांच्या निर्मितीचे हेच ते ठिकाण अथवा अन्य कोणते याबाबत शंकर देव यांच्या लिखाणामध्ये साशंकता वेळोवेळी दिसून येत असल्याने त्यांच्या शिवथरघळशोध समर्थसाहित्यासह समर्थ रामदास स्वामींच्याही साहित्याचे पारायण करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना ११ एप्रिल २००९ रोजी रामदासपठार येथील समर्थमठामागील बाजूस असलेल्या वरंध कुंभारकोंड गावाच्या हद्दीतील उभ्या डोंगरामध्ये एक घळ असल्याचे आढळून आले. भर वैशाख वणवा असलेल्या हवामानातही या घळीच्या डाव्या बाजूला असलेला धबधबा सहा इंच धारेने वाहत असल्याचे दिसून आले. मात्र, या धबधब्याचे पाणी त्या कातळाबाहेर पसरत नसल्याचेही आश्चर्य वाटत होते. घळीच्या प्रवेशद्वाराची भिंत मोजून दोन हात रूंदीची आणि प्रवेशद्वार तीन हात रूंदीचे असल्याने स्थापत्यशैलीचा प्रत्यय येत आहे. या भिंतीच्या बाहेर दोन खण असून दोन खिडक्यांसदृश्य हवा खेळती राहण्यासाठी पोकळयाही आहेत. घळीमध्ये प्रवेश केल्यावर समोरच समर्थ रामदास स्वामींची बसण्याची जागा दिसून येते. या बैठकीवर आसनस्थ झाल्यावर समोर साधारणत: अर्ध्या कि.मी. अंतरावर गोविंदमाची दिसते. तेथून बोलणा-याचे बोलणे थेट घळीमध्ये ऐकू येते. घळीच्या आतमध्ये सव्वासहा फूटापर्यंत तासलेली धनुष्याकृती गुहा आहे. किमान ५० ते ६० माणसे येथे बसू शकतात. या गुहेच्या आतील भागात एक खूपच दूर अशी शेवटाकडे निमूळती होत जाणारी पोकळी आहे. घळीच्या तासलेल्या वरच्या पाषाणाच्या भागात प्रकाशाचे परिवर्तन होऊ शकेल, असे तासलेले दिसून येते. त्यामुळे जशी ही गुहा हवेशीर वाटते तशी पुरेशा प्रकाशानेही परिपूर्ण आहे. घळीच्या आतील भागात असलेली भिंत एक हात रूंदीची असून त्यामागील बाजूला देवघर असावे असा उंचवटा दिसून येतो. तेथे भिंतीमध्ये काही खणही दिसून येतात. आतील हवामान प्रसन्न आहे. समोर पारमाची आणि गोविंदमाचीचे पठार देवगिरी टेकडी, तीन प्रवाह मिळतात असे गुप्तगंगेचे ठिकाण, घळीच्या समोरच संपणारी भटाच्या माळाची हद्द आणि सुरू होणारी मठाच्या माळाची जमीन असे वर्णन महसूल विभागाच्या सातबारा उता-यामध्येही वरंध सजेच्या हद्दीतील कुंभारकोंड गावामध्ये दिसून येते. येथे असलेल्या गुप्तगंगेचा उल्लेखही
'ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा माहानदी।
जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥'
समर्थकृत आनंदवनभुवनी कवनामध्ये दिसून येते. समर्थांनी उल्लेखिलेले आनंदवनभुवनी हे स्थान सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना आढळून आलेले स्वयंभू शिवथरघळ असल्याचा दावा करताना प्रचलित आणि सर्वश्रृत शिवथरघळच आहे आणि येथेच समर्थांनी श्रीदासबोधाची व अन्य ग्रंथ व काव्यांची रचना केली असल्याचे सांगितले आहे. यासाठी त्यांनी असंख्य पुरावेदेखील प्रस्तुत प्रतिनिधीकडे सादर केले. या दाखले अन् पुराव्यांचे सार्थपण ज्या परिसरात हे आनंदवनभुवन आहे, तेथे चपखल बसत असल्याचे प्रत्यक्ष परिसरामध्ये प्रतिनिधीसोबत जाऊन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी दाखविले असल्याने आता या रामदासी सांप्रदायाला केवळ श्रीधरस्वामींना झालेल्या साक्षात्काराऐवजी प्रत्यक्षात समर्थांनी वर्णिलेल्या या आनंदवनभुवनाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 'आनंदवनभुवनी' या कवनामध्ये समर्थांनी
स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी।
तीर्थासी तुळणा नाही। आनंदवनभुवनी॥'
या कवनानुसार समस्त रामदासी परिवाराने आणि समर्थ वाङमयाच्या वाचकांनी या 'तीर्थासी तुळणा नाही।' अशा स्वयंभू शिवथरघळीचे दर्शन घेण्याची आवश्यकता आहे. समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनाच्या ५९ व्या कडव्यानंतर सांगता करताना 'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥' असे लिहिले असल्याने सर्व समर्थ अनुग्रहींना या स्वयंभू शिवथरघळीला सर्वप्रथम नाव आणि मान देण्याची आज्ञाच जणू झाली आहे.आतापर्यंत ज्ञात असलेल्या शिवथर घळीबाबत केवळ श्रीधर स्वामींना झालेला दृष्टांत हाच फक्त विश्वसनिय मानण्यापेक्षा असंख्य पुराव्यांसह सदगुरु स्वामी अरविंदनाथ महाराज यांनी नव वर्षाची भेट दिलेल्या स्वयंभू शिवथरघळीचे जगभरातील समस्त रामदासी परिवाराने दर्शन घेवून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ती `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' या समर्थांच्याच आज्ञेसह अनुभवावी अशीच आहे.
सुंदरमठ
रामदासपठार या गावामध्ये ही जागा साधारणत: तीन गुंठे आकाराच्या पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटीश काळापासून 'टॅक्स फ्री' स्वरूप आहे म्हणजेच कायमस्वरूपी धारामाफी देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सातबारा उता-यात मठाचा माळ उल्लेख असलेला हा सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असून येथे 'सिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर संतोषरूप बसले होते' म्हणजेच एका जांभळीच्या झाडाखालील चौथ-यावर समर्थ रामदास स्वामी बसले असताना कल्याणस्वामी शिवछत्रपतींचा निरोप घेऊन आल्याचा समर्थ हृदय ग्रंथाच्या ५०३ पानावर उल्लेख आहे. सप्तकाण्डात्मक श्रीदासायन ग्रंथाच्या पृष्ठ क्र. २०५ ते २०७ वरील उल्लेख पाहता 'सुंदरमठ म्हणजेच शिवथरची घळ हे श्री.सां.का.ले.२६ वरून निश्चित;कारण त्यात दुसरे दिवशी सुंदरमठी (शिवसमर्थांची) भेटी जाली' असे स्पष्ट म्हटले आहे. याप्रमाणे आपणास आतापर्यंत माहित असलेल्या शिवथरघळीच्या परिसरात सुंदरमठ दिसून येतो तो गेल्या अर्धशतकात बांधलेला आहे. कारण या शिवथरघळीचा शोधच मुळी १९१० साली समर्थ वाङमयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहासतज्ज्ञ सेतू माधव पगडी यांच्यासह सामूहीक प्रयत्नांतून लागला आहे. या सर्वश्रृत शिवथरघळीची जागा धबधब्यालगत असली तरी तो धबधबा जेथे कोसळतो त्यालगत आहे. म्हणजे या जागेचे वर्णन रामदासस्वामींना अभिप्रेत 'स्वर्गाहून सुंदर' म्हणायला ती घळ तेवढया उंचीवर नाही. येथे असलेल्या सुंदरमठाचे बांधकाम हे ऐतिहासिक जागेत नाही. मात्र, सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असलेल्या या जागेत सुंदरमठाचा इतिहास हा महाराष्ट्रातील समर्थ भक्तजनांना ख-या दासबोधादी ग्रंथांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. कारण सर्वशृत शिवथरघळीपासून सुंदरमठापर्यंत दररोज ये-जा करणे समर्थांना केवळ अशक्य असल्याचे वारकरी संप्रदायाच्या चालण्याच्या वेगाचा ताळमेळ घालता दिसून येते. त्यावरून या सुंदरमठाजवळच हे दासबोधाचे जन्मस्थान असावे, या निष्कर्षाप्रत आल्यावर आढळून आलेल्या स्वयंभू आनंदवनभुवनी शिवथरघळीचे महत्व समर्थ रामदासस्वामींसाठी 'आनंदवनभुवनी॥' या उल्लेखाच्या सार्थ भावाप्रत असल्याचे आढळून येते. अफझलखानाने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आनी भाद्रपदमासी,
रामदासपठार या गावामध्ये ही जागा साधारणत: तीन गुंठे आकाराच्या पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटीश काळापासून 'टॅक्स फ्री' स्वरूप आहे म्हणजेच कायमस्वरूपी धारामाफी देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सातबारा उता-यात मठाचा माळ उल्लेख असलेला हा सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असून येथे 'सिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर संतोषरूप बसले होते' म्हणजेच एका जांभळीच्या झाडाखालील चौथ-यावर समर्थ रामदास स्वामी बसले असताना कल्याणस्वामी शिवछत्रपतींचा निरोप घेऊन आल्याचा समर्थ हृदय ग्रंथाच्या ५०३ पानावर उल्लेख आहे. सप्तकाण्डात्मक श्रीदासायन ग्रंथाच्या पृष्ठ क्र. २०५ ते २०७ वरील उल्लेख पाहता 'सुंदरमठ म्हणजेच शिवथरची घळ हे श्री.सां.का.ले.२६ वरून निश्चित;कारण त्यात दुसरे दिवशी सुंदरमठी (शिवसमर्थांची) भेटी जाली' असे स्पष्ट म्हटले आहे. याप्रमाणे आपणास आतापर्यंत माहित असलेल्या शिवथरघळीच्या परिसरात सुंदरमठ दिसून येतो तो गेल्या अर्धशतकात बांधलेला आहे. कारण या शिवथरघळीचा शोधच मुळी १९१० साली समर्थ वाङमयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव आणि इतिहासतज्ज्ञ सेतू माधव पगडी यांच्यासह सामूहीक प्रयत्नांतून लागला आहे. या सर्वश्रृत शिवथरघळीची जागा धबधब्यालगत असली तरी तो धबधबा जेथे कोसळतो त्यालगत आहे. म्हणजे या जागेचे वर्णन रामदासस्वामींना अभिप्रेत 'स्वर्गाहून सुंदर' म्हणायला ती घळ तेवढया उंचीवर नाही. येथे असलेल्या सुंदरमठाचे बांधकाम हे ऐतिहासिक जागेत नाही. मात्र, सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाच्या समर्थमठाचा परिसर असलेल्या या जागेत सुंदरमठाचा इतिहास हा महाराष्ट्रातील समर्थ भक्तजनांना ख-या दासबोधादी ग्रंथांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचविण्यास कारणीभूत ठरतो. कारण सर्वशृत शिवथरघळीपासून सुंदरमठापर्यंत दररोज ये-जा करणे समर्थांना केवळ अशक्य असल्याचे वारकरी संप्रदायाच्या चालण्याच्या वेगाचा ताळमेळ घालता दिसून येते. त्यावरून या सुंदरमठाजवळच हे दासबोधाचे जन्मस्थान असावे, या निष्कर्षाप्रत आल्यावर आढळून आलेल्या स्वयंभू आनंदवनभुवनी शिवथरघळीचे महत्व समर्थ रामदासस्वामींसाठी 'आनंदवनभुवनी॥' या उल्लेखाच्या सार्थ भावाप्रत असल्याचे आढळून येते. अफझलखानाने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आनी भाद्रपदमासी,
'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला।
सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥'
हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. यंदा या सुंदरमठात शनिवारी, ११ सप्टेंबर २०१० रोजी ३६५ वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रामदासपठार गावातील १० गणेशमूर्ती आणि अकरावा सुंदरमठातील गणपती असे दिसून आले. यामुळे समर्थांनी 'आनंदवनभुवनी॥' कवनात लिहिलेल्या १७ व्या कडव्यातील
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचि ना।
गुप्त ते, गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥'
या विचित्रयोगाचा महिमा समर्थांप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधीसदेखील चक्रावणारा आहे. कारण ज्या दिवशी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना स्वयंभू शिवथरघळ आढळून आली ती दिनांक ११/०३/२००९ म्हणजे २ + ९ =११ आणि समर्थांचे आनंदवनभुवन आणि सुंदरमठ सर्वसमर्थप्रेमींना नववर्षाची भेट म्हणून जाहिर करावयाचे आहे, तो दिवसही शनिवार अन् दिनांक आहे 0१/0१/११ म्हणजे हे अकरा अकराच आहे.
या विचित्रयोगाचा महिमा समर्थांप्रमाणे प्रस्तुत प्रतिनिधीसदेखील चक्रावणारा आहे. कारण ज्या दिवशी सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना स्वयंभू शिवथरघळ आढळून आली ती दिनांक ११/०३/२००९ म्हणजे २ + ९ =११ आणि समर्थांचे आनंदवनभुवन आणि सुंदरमठ सर्वसमर्थप्रेमींना नववर्षाची भेट म्हणून जाहिर करावयाचे आहे, तो दिवसही शनिवार अन् दिनांक आहे 0१/0१/११ म्हणजे हे अकरा अकराच आहे.
अरविंदनाथ महाराजांनी उलगडला 'रामदासपठार'चा सर्व इतिहास
श्रीक्षेत्र रामदासपठार येथे श्रीसमर्थ रामदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त तपोनिधी सद्गुरू श्रीअरविंदनाथ महाराज यांचे सांगतेचे प्रवचन आयोजित करण्यात आले असता त्यांनी प्रवचनामध्ये रामदासपठारचा ऐतिहासिक भूगोलच समर्थ परिवारासमोर मांडला. यावेळी अरविंदनाथ महाराजांनी शोधलेल्या दासबोधादी सर्वग्रंथलेखनाचे जन्मस्थान घळीचा उल्लेख 'आनंदवनभुवन' असा करण्यास मान्यता दर्शवून यासंदर्भात उद्भवू पाहणा-या वादांना पूर्णविराम दिला. या प्रवचनाची चर्चा सध्या संपूर्ण प्रांतामध्ये होत आहे. सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाचा समर्थ मठ असलेल्या ठिकाणी मोठया शामियान्यामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवार,दि.२० फेब्रुवारी २०११ पासून दासनवमी उत्सवानिमित्त सुरू झालेले श्रीसमर्थांना अभिषेक, कलशपूजन, ध्वजारोहण, वीणापूजन, व्यासपीठपूजन, त्यानंतर दासबोध पारायण, काकडा, प्रात:स्मरण, मनाचे श्लोक, किर्तन, प्रवचन, हरिजागर आणि सकाळची तसेच संध्याकाळची पंगत आदींसह अखंड श्रीदासबोधाचे वाचन अशा दैनंदिन कार्यक्रमांचा अखेरचा दिवस असल्याने सकाळी ८ वाजल्यापासूनच रामदासपठारकडे सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी परिसरातील श्रध्दाळूंची आगेकूच सुरू झाली.याप्रसंगी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी, आतापर्यंत रामदासपठारचा मठाचा माळ आणि भटाचा माळ असे दोन सातबाराचे उतारे आढळून आले असता त्यांचा सुंदरमठ आणि दिवाकरभट या दोन समर्थकालीन संकल्पनांसोबत संदर्भ आढळून आला, असे सांगून या रामदासपठार गावाचा तत्कालीन उल्लेख नवलवाडीयाचा कोंड असा होत असे तर या कोंडाच्या परिसरामध्ये मंडपाचा माळ, जांभळीचा माळ, उंबराचा माळ, फणसीचा माळ, बोरीचा माळ, देवळाचा माळ, आडाचा माळ, गाराचा माळ आणि घाणीचा माळ असे जमिनींची नांवे असलेल्या सातबारा महसूली उता-यांची पूर्वापार नोंदी असलेली जंत्रीच हाती लागली असून या कागदपत्रांद्वारे रामदासपठारचा ऐतिहासिक भूगोल स्पष्ट होण्यास मदत होत आहे, असे स्पष्ट केले. या परिसरात घाणीचा माळ येथे तेलाच्या घाणीचे क्षेत्र असून येथे अन्य भागाच्या तुलनेत माती असूनही गवत उगवण्याचे प्रमाण तुरळक असल्याचे दिसून येत आहे. आडाचा माळ या जमिनीमध्ये आड म्हणजेच विहिर दिसून आली आहे तर गाराच्या माळावरील हवा अन्यठिकाणच्या तुलनेत अतिशय गारवा असलेली आहे. मठाच्या माळालगतच मंडपाचा माळ नावाची जमीन दिसून आल्याने या ठिकाणी पहिला पाच महिने कालावधीचा गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर भाविकांसाठी मंडपाची सुविधा येथे करण्यात आल्याचे दिसून येते तर घाणीचा माळ ही जमीन या लगतच असल्याने त्याकाळी छ.शिवरायांनी दिलेले अन्न शिजविण्याकामी लागणारे तेल या घाणीद्वारे तयार केले जात असावे, असा तर्कसंगत आधार असल्याचे यावेळी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी सांगितले.यावेळी यासंदर्भातील अभ्यासक पत्रकार शैलेश पालकर, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अपेक्षा कारेकर, अमोल कारेकर, माझेरीचे सरपंच अनिल मालुसरे आणि वैशाली जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार पालकर यांनी, सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी शोधलेली दासबोधादी सर्वग्रंथलेखनाचे जन्मस्थान घळ हेच समर्थ रामदास स्वामी यांचे दहा संवत्सरापर्यंत सलग वास्तव्याचे ठिकाण होते हे निर्विवाद सत्य असल्याचे सांगून स्वत: समर्थांनी या घळीचा उल्लेख कोणत्याही गावाच्या नावाने केला नसल्याकडे लक्ष वेधले. यासाठी पालकर यांनी 'सुंदर पाहोन वास केला। दास संन्निध ठेविला। अवघा प्रांतचि पावन केला। कृपाळूपणे॥' याखेरिज 'समर्थ सुंदरमठी गणपती केला।दोन्ही पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद मासपर्यंत॥' या समर्थकृत लेखनामध्ये प्रांत अशी शब्दरचना केली आहे आणि प्रांताचा नामोल्लेख टाळला आहे तर घळीचा उल्लेख करण्यासाठी 'आनंदवनभुवन' हे ५९ कडव्याचे दीर्घ काव्य लिहिले आहे, हे लक्षात घेऊन या घळीला 'आनंदवनभुवन' असे नांव अजरामर करावे, असे आवाहन केले. केवळ दिवाकरभटांच्या पत्रात हा उल्लेख 'श्रीकडील हरेकविशी बोभाट होऊ नये यासाठी समर्थ दहा संवत्सरापर्यंत कोठे न जाता ... येकांतस्थळी शिवरथरचे घळी जाऊन बसले.. असा संदर्भ आहे. यानंतर अनेकांनी असाच उल्लेख केला असला तरी समर्थांनी मात्र, आनंदवनभुवनी असा उल्लेख केला आहे. 'शिवरथरचे घळी' या उल्लेखाशी साधर्म्य असलेल्या गावातच ही घळ पाहिल्याचे मत ज्यांनी ज्यांनी मांडले; त्या शंकर श्रीकृष्ण देवांनाही तशी ठाम खात्री देता नव्हती जी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी शोधलेल्या घळीबाबत ठामपणे व्यक्त करता येते, असे सांगून समर्थांनी जो उल्लेख टाळला तो या घळीसंदर्भात आपणही टाळून वाद उद्भवू देऊ नये, असे सांगितले. यावेळी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी या घळीला 'आनंदवनभुवन' म्हणण्यास मान्यता दिल्याने सर्व समर्थप्रेमींनी 'जय जय रघुवीर समर्थ' चा जयघोष करून आनंद व्यक्त केला. दासपरिवाराची दिशाभूल
दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शिवथरघळ संशोधनाबाबत विद्वानपरिषद हवी
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे आवाहन
समर्थ रामदासस्वामी यांनी सर्वग्रंथ लेखन केलेल्या वरंध कुंभारकोंड येथील आनंदवनभुवन घळीचे संशोधन करणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचे काहींनी शिवथरघळ येथे पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याच्या बातम्या शुक्रवारी दि.११ मार्च २०११ रोजी काही दैनिकांमध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असता शिवथरघळ विश्रामगृहाच्या उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणी आणि ठेकेदारी व्यवसायातील लोकांनी घेतलेली 'ती'पत्रकार परिषद जरी अरविंदनाथ महाराज यांच्या संशोधन कार्यावर शिंतोडे उडविणारी असली तरी त्यांनी ज्या विद्वानांचा उल्लेख केला आहे; त्यांना सोबत घेऊन संशोधनाबाबत विद्वान परिषद घ्यावी, असे आवाहन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनाही त्यांनी 'वेद तो मंद जाणावा। सिध्द आनंदवनभुवनी। अतुळ महिमा तेथे।आनंदवनभुवनी॥' असे लिहिल्यानंतर समर्थांच्या कारभा-यांच्या त्रासामुळे समर्थांना गागाभट्ट यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे विद्वान परिषदेला सामोरे जावे लागले होते. या विद्वान परिषदेमध्ये समर्थांनी एका मोळी विकणा-या माणसाकडून वेद म्हणवून घेतले आणि तो मोळी विकणारा तत्पूर्वीच्या जन्मातील संत ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतलेला रेडा आणि तत्पूर्वीच्या जन्मात शापित गंधर्व होता, हे सप्रमाण दाखवून देत त्यांच्या विधानाला पुष्टी दिली, असे सांगून याच धर्तीवर ज्यांनी पत्रकार परिषदेत ज्या विद्वानांचा नामोल्लेख केला आहे; त्यांनाच त्या परिषदेत उपस्थित केले असता त्या आरोपांना वेगळे महत्व आले असते. आरोपकर्त्यांनी त्यांच्या शिवथरघळीचे पुरेसे समर्थन केले नसून केवळ अरविंदनाथ महाराजांविरूध्द तोंडसुख घेतले आहे, असे सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचे म्हणणे आहे. या बातमीमागे शिवथरघळ येथील विश्रामगृहाच्या उद्धाटनाच्या पार्श्वभूमीचा मुहूर्त जरी असला तरी ज्या दिवशी आनंदवनभुवनाच्या शोधाची बातमी प्रसिध्द झाली त्या दिवशी ११११ दिनांक होती तर आरोपकर्त्यांची बातमीदेखील ११३११ रोजी प्रसिध्द झाली आहे. यावरून 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥' आरोपकर्त्यांनीदेखील या समर्थरचित 'आनंदवनभुवनी' काव्यातील अनुभव आम्हास दिला आहे, असे गूढ विधान सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केले असून समर्थांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याइतके गिरिधरस्वामी नक्कीच मोठे होते, असे आरोपकर्त्यांना म्हणावयाचे असेल तसेच दिवाकर भटाने लिहिलेल्या पत्रातील उल्लेखात 'शिवरथर' असे लिहिल्याचा संदर्भ देणारे आरोपकर्ते समर्थांनी मात्र 'प्रांत'असा उल्लेख का केला, याचे उत्तर देत का नाहीत, असा प्रश्न सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केला आहे.राजकारणी आणि ठेकेदारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपकर्त्यांचा समर्थ वाङमयाचा उत्तरे देण्याएवढा अभ्यास नसल्याने त्यांनी विद्वान परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घ्यावा, आम्हीदेखील सर्व समर्थभक्तांना निशंकपणे आनंदवनभुवनाचे दर्शन व्हावे यासाठी विद्वानांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे ठामपणे सांगितले आहे.
सन्निध रामवरदायिनी।
सप्तकान्डात्मक श्री दासायन पृष्ठ क्रमांक २०९ सुंदर मूर्ती सुंदर गुण। सुंदर कीर्ती सुंदर लक्षण। सुंदर माथी देवे आपण। वास केला।.................अंतरनिष्ठ अखंड ध्यानी। सन्निध रामवरदायिनी। विश्व माता त्रैलोक्यजननी। मुळ माया।। समर्थ रामदास पठार या सध्याच्या नावाने प्रसिध्द गावातील सुंदर मठ येथून अंतरनिष्ठ अखंड ध्यानी झाले की त्यांना समोरची रामवरदायिनी जी प्रतापगड पारसोंड येथे समर्थांनीच स्थापन केली ती सन्निध दिसत असे. आता आपण हि दोन्ही ठिकाणे google map अथवा wikimapia .org या संकेत स्थळावरून समोर समोर असल्याचे पाहू शकतो. कारण आपण समर्थांसारखे अंतरनिष्ठ अखंड ध्यानी नसल्याने satelite ची मदत घ्यावी लागते. आता मात्र आपण अभ्यासूनच येथे प्रकटावे शंका निरसन होईल. या पानावर २० ओळीमध्ये असेही लिहिले आहे... हे वर्णन शिवथरचे की चाफळचे? का दोन्ही ठिकाणे त्यात अभिप्रेत आहेत? अथवा आपणास माहित नसलेल्या तिसऱ्या एखाद्या सुंदर मठाचे वर्णन यात आहे? आणि पुढे २५ व्या ओळीत समर्थ भक्तांनी या दोन्ही प्रकरणी उलगडा करण्याचा प्रयत्न करावा म्हणून येथे ती दिली आहेत. असेही म्हटले आहे. ३३ व्या ओळीत यापैकी कोणत्या स्थानास समर्थांनी राम वरदायिनी म्हटले आहे ते समजत नाही. पारचे राम वरदायिनी चे स्थान शिवथर ला सन्निध नाही. असे म्हटले आहे.
आता त्यानंतर जे काही लिहिले गेले ते खरे किंवा सुंदर मठाला राम वरदायिनी सन्निध दिसलेली जागा सुंदर मठ? हे छायाचित्रात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
वरंधजवळील रामगंगा धबधबा अन् गुप्तगंगा दर्शन वर्षापर्यटकांना पर्वणी!
महाड ते पुणे महामार्गावर वरंध घाटामधून माझेरीजवळच्या कावळा किल्ल्याच्या मागे रामदासपठारकडे जाणा-या रस्त्यावरून रामदासपठारकडे गेल्यानंतर तेथून काही मिनिटांच्या अंतरावर पावसाचे जलतुषार अंगावर घेत वर्षासहलीचा आनंद घेताना समर्थ रामदासस्वामींच्या आनंदवनभुवनालगतचा रामगंगा धबधबा यंदा समर्थभक्तांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणार आहे. येथील गुप्तगंगेचे दर्शनही दासबोधातील वर्णनानुरूप आहे, याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शीना यानिमित्ताने येऊ शकेल. याठिकाणी केलेले पर्यटन म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन आल्याचा अनुभव असेल, असे समर्थांनी आनंदवनभुवन काव्यामध्ये वर्णन केले आहे. 'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासि तुळणा नाही। आनंदवनभुवनी।' या कडव्यामध्ये समर्थांनी आकाशातून लोटल्यासारख्या वाटणा-या जलप्रपाताचे वर्णन केले आहे. या जलप्रपाताचे उगमस्थान नसल्याने लोटली असा शब्दप्रयोग केला आहे. हा जलप्रपात 'रामवेधी निरंतरी।' म्हणजेच येथे असलेल्या घळीचा आकार प्रवेशद्वारापासून अंतरभागापर्यंत रामाच्या धनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार आहे, या घळीच्या जवळचा हा जलप्रपात असलेला धबधबा आहे; म्हणून या धबधब्याला समर्थ 'रामगंगा' असे म्हणतात. गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे हा धबधबा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात असल्याने या धबधब्यास घळीच्या 'रामवेधी' आकारानुसार राम आणि जलप्रवाहाच्या दिशेनुसार गंगा असा 'रामगंगा' उल्लेख समर्थांनी केला आहे. या रामगंगा धबधब्याकडे पाहून या आनंदवनभुवन काव्यातील 'उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया। जप तप अनुष्ठाने। आनंदवनभुवनी।' या कडव्याची सार्थता येथे येणा-यांस जाणवते. या धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे साधारणत: १५ फूट लांब आणि ९ फूट रूंदीचे सपाट कातळ दिसून येते. सुर्याचे दक्षिणायन सुरू होताना स्नानसंध्या, जप, तप आणि अनुष्ठाने तसेच पुरश्चरणं करण्यास समर्थ रामदासस्वामींना या रामगंगा धबधब्याच्या उदंड पाण्याचा उपयोग होत असल्याचा या कडव्याचा अर्थ येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांना नक्कीच अनुभवता येईल.समर्थ प्रतापातील गिरीधरस्वामीलिखित उल्लेखानुसार तसेच 'समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्यप्रकाश सन्निध उदक उर्ध्वगमन। मार्ग सोपान करूनी जावे॥ समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या जलप्रपातास समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.येथे असलेल्या गुप्तगंगेचा उल्लेखही ' ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा महानदी। जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥' समर्थकृत आनंदवनभुवनी कवनामध्ये दिसून येते. यात समर्थांच्या सर्वग्रंथलेखनात श्रीमद दासबोध हा ग्रंथ आहे. यामध्ये ज्याप्रमाणे गुप्तगंगेचे वर्णन करण्यात आले आहे. त्यावर्णनानुसार येथील गुप्तगंगा आहे, हे या वर्षापर्यटनादरम्यान पडताळून पाहता येईल. येथेदेखील गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे दासबोधातील दशक अकरावे- समास सातवा मध्ये वर्णन केल्यानुसार 'केवळ अचंचळी निर्माण जाली। अधोमुखें बळें चालिली। अखंड वाहे परी देखिली। नाहींच कोणी।' अशा या गुप्तगंगेमध्ये 'वळणें वाकाणें भोवरे। उकळया तरंग झरे। लादा लाटा कातरे। ठाईं ठाई॥ शुष्क जळाचे चळाळ। धारा धबाबे खळाळ। चिपळया चळक्या भळाळ। चपळ पाणी॥ फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे। थेंब फुई मोजावे॥ अणुरेणू किती॥ वोसाणे वाहती उदंड। झोतावे दकटे दगड। खडक बेटे आड। वळसा उठे॥ मृद भूमी तुटोन गेल्या। कठीण तैश्याच राहिल्या। ठाईं ठाईं उदंड पाहिल्या। सृष्टीमध्ये।' अशाप्रकारची वर्णने यादीनुसार प्रत्यक्ष पाहण्यास मिळतात. यातही सर्वात महत्वाचे म्हणजे या समासात म्हटल्याप्रमाणे 'येक बळाचे निवडले। ते पोहतचि उगमास गेले। उगमदर्शने पवित्र जाले। तीर्थरूप॥ तेथें ब्रह्मादिकांची भुवनें। ब्रह्मांडदेवतांची स्थाने। उफराटी गंगा पाहातां मिळणे। सकळांस तेथे॥' पर्यटकांनी या गुप्तगंगेच्या प्रवाहाविरूध्द वाटचाल केली की, समोरच आनंदवनभुवन असल्याचे पाहण्यास मिळते. हा मार्ग मात्र, वरंध कुंभारकोंड येथून आनंदवनभुवनाकडे पायी चालत जाण्याचा आहे.समर्थांच्या ख-या शिवथरघळीचा शोध सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी यंदा ११२०११ रोजी तमाम समर्थभक्तांना नववर्षभेट दिल्यानंतर येत्या शनिवारी, ११ जून २०११ रोजी ज्येष्ठ शुध्द दशमीला गंगेचे स्वर्गातून भूतलावर आगमन झाल्याचा दिवस गंगादशमी आहे. यादिवशी अन् त्यापुढेदेखील समर्थांच्या रामगंगा आणि गुप्तगंगा या माहानद्यांचे दर्शन घेण्याची पर्वणी या पावसाळयापासून वर्षासहलींच्या पर्यटकांप्रमाणेच समर्थभक्तांनादेखील उपलब्ध होणार आहे.
धबधबे सांगतात समर्थांचे वास्तव्य...!
हेळवाकला 'गिरीचे मस्तकी गंगा...'
महाड तालुक्यातील सर्वशृत शिवथरघळीलगतच्या जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, अलिकडेच, ख-या शिवथर घळीचा शोध लागताना अनेक खोटया संकल्पनाही उघड होऊ लागल्या आहेत. यामध्ये चिपळूणजवळील हेळवाकच्या घळीलगतच्या धबधब्याचे वर्णन समर्थांनी 'गिरीचे मस्तकी गंगा...' असे केल्याचे समर्थ वाङमयाद्वारे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, सर्वशृत शिवथरघळीलगतच्या धबधब्याला 'खुटयाचा विरा' असे त्याकाळी नांव होते, अशीही पुराव्यासह माहिती हाती लागली आहे.
हेळवाकच्या धबधब्याचे वर्णन...'गिरीचे मस्तकी गंगा।...'
चिपळूणमार्गे कुंभार्ली घाटातून कोयना जलविद्युत केंद्राच्या वर घाटमाथ्यावर आल्यानंतर तिथल्या हनुमंतमंदिरापासून अनेक धबधबे दिसून येतात. हेळवाळ गावाजवळील रामघळीकडे जाताना कोंढावळयाच्या धनगरवाडीवर थांबून घनदाट जंगलातून वाट काढावी लागते. काही अंतरावर एका कपारीवरून थेट दरीमध्ये कोसळणा-या एका जलप्रपाताचे म्हणजेच धबधब्याचे दर्शन होते. ही कपारी म्हणजेच रामघळ जी समर्थ रामदासस्वामींनी चिंतनासाठी उपयोगात आणली. सुमारे सव्वाशे फूट उंचावर एका खोल दरीलगतच्या घळीत शंकराच्या एका पिंडीखेरिज काहीच नाही. या रामघळीबाबत इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्या 'समर्थ आणि समर्थ संप्रदाय' या चिंतन ग्रंथामध्ये ६ व्या पानावर 'गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालली बळे। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे। गर्जतो मेघ सिंधु। ध्वनी कल्लोळ उठिला। कडयासी आदळे धारा। वात-आवरक्त होतसे। तुषार उठती रेणू। सीत मिश्रित धुकटे। दराची तुटला मोठा।' हे हेळवाळच्या धबधब्याचे वर्णन असल्याचे नमूद केले आहे. जे येथे येऊन अनुभवावे असेच आहे. याच ग्रंथातील १२४ पानावर गद्यपत्रे प्रकरणात सेतू माधव पगडी यांनी समर्थांनी इ.स.१६७४ मधील रघुनाथभटांना उद्देशून खास त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या पत्रातील मजकूरामध्ये हेळवाकच्या घळीत चातुर्मासांत समर्थांना सीतळाईचा म्हणजेच हेळवाकच्या धबधब्याच्या कर्कश्य आवाजासोबतच्या बोच-या थंडीचा त्रास झाला असताना रघुनाथभटांनी समर्थांना चाफळ या उष्ण स्थळी पाठविल्याबद्दल विनम्रतापूर्वक आभार मानत असल्याचा उल्लेख आहे.
'खुटयाच्या विरा'ला 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा
समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य सर्वग्रंथलेखन काळात कुंभेजाईदेवीलगतच्या लोकवस्तीत असल्याचे साशंकतेसह सांगणारे समर्थ वाङमयाचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव तथा नानासाहेब देव यांनी महाड तालुक्यातील या आंबेजाईच्या लगतच्या लोकवस्तीला आंबेशिवथर असे म्हटले आहे अन् येथील घळीला शिवथरघळ म्हणताना जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, या धबधब्याबाबत 'राजधानी रायगड' या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथमाला क्र.२४ मध्ये विष्णू वासुदेव जोशी लिखित या ग्रंथामध्ये सर्वशृत शिवथरघळीच्या संशोधनाच्या काळातील वर्णनाचा उल्लेख दिसून येतो. ११८ व्या पानावरील १६ व्या प्रकरणात 'शिवतराच्या आग्नेयेस २ फर्लांगावर डोंगराच्या पायथ्याशीच दरडीत एक घळई आहे. घळ लेण्यांप्रमाणे खडकांत खोदली असून यात अनेक खोल्या आहेत. हल्ली त्या खोल्या नादुरूस्त व अंध:कारमय आहेत. घळईत शेजारी पाण्याचा लहानसा झोत पडतो. घळईच्या शेजारी हा 'खुटयाचा विरा' नावाचा ओढा आहे.' असे वर्णन असून तेव्हा शिवथरघळीशेजारी पाण्याचा लहानसा असलेला झोत आता प्रचंड कसा झाला. याबाबत या निर्जन ठिकाणी 'हे वर्णन शिवथरचे की चाफळचे की दोन्ही ठिकाणचे किंवा आपणास अद्याप माहिती नसलेल्या तिस-याच शिवथरघळीचे' अशी स्वत: संशोधक शंकर श्रीकृष्ण देवांनी व्यक्त केलेली साशंकता दूर करण्याचे काही प्रयत्न झाल्याने हा खुटयाचा विरा आता जीवघेणा जलौघ झाला आहे. या धबधब्यात पडलेले महाकाय पाषाण पुन्हा जागचे जागी लावले तर पुर्वीचा 'खुटयाच्या विरा' हा पाण्याचा लहानसा झोत होता हे दिसून येईल. हा 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा देण्यासाठी झालेला प्रयत्न प्रत्यक्षात येथे येणारे समर्थभक्त सर्वांगाने भिजतात; तर समर्थांनी लिहिलेला दासबोध कसा सुका राहिल? मग तो समर्थभक्तांना वाचण्यास कसा मिळेल? याबाबतची नवीन सहजसुलभ शंका निर्माण करतो.
रामदासपठार येथील 'रामगंगा' धबधबा रामवेधी आकाराच्या 'आनंदवनभुवन'लगत
महाड ते पुणे महामार्गावर वरंध घाटामधून माझेरीजवळच्या कावळा किल्ल्याच्या मागे रामदासपठारकडे जाणा-या रस्त्यावरून रामदासपठारकडे गेल्यानंतर तेथून काही मिनिटांच्या अंतरावर पावसाचे जलतुषार अंगावर घेत वर्षासहलीचा आनंद घेताना समर्थ रामदासस्वामींच्या आनंदवनभुवनालगतचा रामगंगा धबधबा यंदा समर्थभक्तांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणार आहे. येथील गुप्तगंगेचे दर्शनही दासबोधातील वर्णनानुरूप आहे, याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शीना यानिमित्ताने येऊ शकेल. याठिकाणी केलेले पर्यटन म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन आल्याचा अनुभव असेल, असे समर्थांनी आनंदवनभुवन काव्यामध्ये वर्णन केले आहे.'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासि तुळणा नाही। आनंदवनभुवनी।' या कडव्यामध्ये समर्थांनी आकाशातून लोटल्यासारख्या वाटणा-या जलप्रपाताचे वर्णन केले आहे. या जलप्रपाताचे उगमस्थान नसल्याने लोटली असा शब्दप्रयोग केला आहे. हा जलप्रपात 'रामवेधी निरंतरी।' म्हणजेच येथे असलेल्या घळीचा आकार प्रवेशद्वारापासून अंतरभागापर्यंत रामाच्या धनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार आहे, या घळीच्या जवळचा हा जलप्रपात असलेला धबधबा आहे; म्हणून या धबधब्याला समर्थ 'रामगंगा' असे म्हणतात. गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे हा धबधबा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात असल्याने या धबधब्यास घळीच्या 'रामवेधी' आकारानुसार राम आणि जलप्रवाहाच्या दिशेनुसार गंगा असा 'रामगंगा' उल्लेख समर्थांनी केला आहे. या रामगंगा धबधब्याकडे पाहून या आनंदवनभुवन काव्यातील 'उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया। जप तप अनुष्ठाने। आनंदवनभुवनी।' या कडव्याची सार्थता येथे येणा-यांस जाणवते. या धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे साधारणत: ३५ फूट लांब आणि १९ फूट रूंदीचे सपाट कातळ दिसून येते. सुर्याचे दक्षिणायन सुरू होताना स्नानसंध्या, जप, तप आणि अनुष्ठाने तसेच पुरश्चरणं करण्यास समर्थ रामदासस्वामींना या रामगंगा धबधब्याच्या उदंड पाण्याचा उपयोग होत असल्याचा या कडव्याचा अर्थ येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांना नक्कीच अनुभवता येईल.समर्थ प्रतापातील गिरीधरस्वामीलिखित उल्लेखानुसार तसेच 'समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन। मार्ग सोपान करूनी जावे॥ समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
माघ चतुर्थी महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस
भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या आजच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.
'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला. यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.
माघ चतुर्थी महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस
भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या आजच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.
'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला. यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.
छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट
सिवतर तालुका,मौजे पारमाची,कोंड नलवडा,
'नलावडे कोंड'बाबतचे दूर्लक्ष वादाचे कारण
समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी 1 जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या खऱ्या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक 13 मध्ये पान क्र.22 वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे.
इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुसऱ्या प्रकरणात पान क्रमांक 11 पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87 नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. 1675 ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा, मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके1597 भाद्रपद वद्य 8 रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी 12 वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुसऱ्या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिसऱ्या कारभाऱ्याच्या हातची आहेत.
या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे 12 वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा खऱ्या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.
हेळवाकला 'गिरीचे मस्तकी गंगा...' सर्वशृत शिवथरघळीजवळ 'खुटयाचा विरा'
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना नांवे ठेवण्याचा व्यर्थ खटाटोप
महाड तालुक्यातील सर्वशृत शिवथरघळीलगतच्या जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, अलिकडेच, खऱ्या शिवथर घळीचा शोध लागताना अनेक खोटया संकल्पनाही उघड होऊ लागल्या आहेत. यामध्ये चिपळूणजवळील हेळवाकच्या घळीलगतच्या धबधब्याचे वर्णन समर्थांनी 'गिरीचे मस्तकी गंगा...' असे केल्याचे समर्थ वाङमयाद्वारे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, सर्वशृत शिवथरघळीलगतच्या धबधब्याला 'खुटयाचा विरा' असे त्याकाळी नांव होते, अशीही पुराव्यासह माहिती हाती लागली आहे. मात्र, ग्रामस्थांना पुढे करून काही मंडळी या संशोधनाला आणि संशोधक सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना नांवे ठेवण्याचा खटाटोप करीत आहेत. ग्रामस्थांनी इतिहास संशोधक आणि समर्थ साहित्याचे अभ्यासक असलेल्या मंडळींना सोबत घेऊन याविषयी विद्वान परिषद घेण्याचे आवाहन यासंदर्भात सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केलेले असूनही त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे दोषारोप लावण्याचे काम कोणत्या तरी पडद्यामागच्या सूत्रधारांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. शिवथरघळीच्या शोधाबाबतच्या सोबतच्या पुराव्यांचा पडताळा करून हे पुरावे खोटे किंवा खरे ठरवा. मात्र,सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणे चुकीचा असल्याने तसे करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेळवाकच्या धबधब्याचे वर्णन...'गिरीचे मस्तकी गंगा।...'
चिपळूणमार्गे कुंभार्ली घाटातून कोयना जलविद्युत केंद्राच्या वर घाटमाथ्यावर आल्यानंतर तिथल्या हनुमंतमंदिरापासून अनेक धबधबे दिसून येतात. हेळवाळ गावाजवळील रामघळीकडे जाताना कोंढावळयाच्या धनगरवाडीवर थांबून घनदाट जंगलातून वाट काढावी लागते. काही अंतरावर एका कपारीवरून थेट दरीमध्ये कोसळणाऱ्या एका जलप्रपाताचे म्हणजेच धबधब्याचे दर्शन होते. ही कपारी म्हणजेच रामघळ जी समर्थ रामदासस्वामींनी चिंतनासाठी उपयोगात आणली. सुमारे सव्वाशे फूट उंचावर एका खोल दरीलगतच्या घळीत शंकराच्या एका पिंडीखेरिज काहीच नाही. या रामघळीबाबत इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्या 'समर्थ आणि समर्थ संप्रदाय' या चिंतन ग्रंथामध्ये 6 व्या पानावर 'गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालली बळे। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे। गर्जतो मेघ सिंधु। ध्वनी कल्लोळ उठिला। कडयासी आदळे धारा। वात-आवर्त होतसे। तुषार उठती रेणू। सीत मिश्रित धुकटे। दराची तुटला मोठा।' हे हेळवाळच्या धबधब्याचे वर्णन असल्याचे नमूद केले आहे. जे येथे येऊन अनुभवावे असेच आहे. याच ग्रंथातील 124 पानावर गद्यपत्रे प्रकरणात सेतू माधव पगडी यांनी समर्थांनी इ.स.1674 मधील रघुनाथभटांना उद्देशून खास त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या पत्रातील मजकूरामध्ये हेळवाकच्या घळीत चातुर्मासांत समर्थांना सीतळाईचा म्हणजेच हेळवाकच्या धबधब्याच्या कर्कश्य आवाजासोबतच्या बोचऱ्या थंडीचा त्रास झाला असताना रघुनाथभटांनी समर्थांना चाफळ या उष्ण स्थळी पाठविल्याबद्दल विनम्रतापूर्वक आभार मानत असल्याचा उल्लेख आहे. मात्र, श्रीकृष्ण शंकर देव यांना सापडलेल्या सर्वशृत शिवथरघळीचे समर्थक असलेले ग्रामस्थ या पुराव्यांना आवाहन देण्याऐवजी सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या संशोधनाला तसेच त्यांना वैयक्तिक दोष देताना दिसत आहेत. त्यापेक्षा मूळ संशोधकांना तसेच लेखकांना आव्हान देऊन त्यांना खोटे ठरविण्याची उठाठेव करावी, अशी अपेक्षा आहे. परंतू, तसे न होता आपले अज्ञान आणि असत्य हेच कुंभे-आंबे-कसबे येथील ग्रामस्थ अरविंदनाथ महाराजांना टार्गेट करून मांडत आहेत.
'खुटयाच्या विरा'ला 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा
समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य सर्वग्रंथलेखन काळात कुंभेजाईदेवीलगतच्या लोकवस्तीत असल्याचे साशंकतेसह सांगणारे समर्थ वाङमयाचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव तथा नानासाहेब देव यांनी महाड तालुक्यातील या आंबेजाईच्या लगतच्या लोकवस्तीला आंबेशिवथर असे म्हटले आहे अन् येथील घळीला शिवथरघळ म्हणताना जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, या धबधब्याबाबत 'राजधानी रायगड' या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथमाला क्र.24 मध्ये विष्णू वासुदेव जोशी लिखित या ग्रंथामध्ये सर्वशृत शिवथरघळीच्या संशोधनाच्या काळातील वर्णनाचा उल्लेख दिसून येतो. 118 व्या पानावरील 16 व्या प्रकरणात 'शिवतराच्या आग्नेयेस 2 फर्लांगावर डोंगराच्या पायथ्याशीच दरडीत एक घळई आहे. घळ लेण्यांप्रमाणे खडकांत खोदली असून यात अनेक खोल्या आहेत. हल्ली त्या खोल्या नादुरूस्त व अंध:कारमय आहेत. घळईत शेजारी पाण्याचा लहानसा झोत पडतो. घळईच्या शेजारी हा 'खुटयाचा विरा' नावाचा ओढा आहे.' असे वर्णन असून तेव्हा शिवथरघळीशेजारी पाण्याचा लहानसा असलेला झोत आता प्रचंड कसा झाला. याबाबत या निर्जन ठिकाणी 'हे वर्णन शिवथरचे की चाफळचे की दोन्ही ठिकाणचे किंवा आपणास अद्याप माहिती नसलेल्या तिसऱ्याच शिवथरघळीचे' अशी स्वत: संशोधक शंकर श्रीकृष्ण देवांनी व्यक्त केलेली साशंकता दूर करण्याचे काही प्रयत्न झाल्याने हा खुटयाचा विरा आता जीवघेणा जलौघ झाला आहे. या धबधब्यात पडलेले महाकाय पाषाण पुन्हा जागचे जागी लावले तर पुर्वीचा 'खुटयाच्या विरा' हा पाण्याचा लहानसा झोत होता हे दिसून येईल. हा 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा देण्यासाठी झालेला प्रयत्न प्रत्यक्षात येथे येणारे समर्थभक्त सर्वांगाने भिजतात; तर समर्थांनी लिहिलेला दासबोध कसा सुका राहिल? मग तो समर्थभक्तांना वाचण्यास कसा मिळेल? याबाबतची नवीन सहजसुलभ शंका निर्माण करतो. मात्र, या खुटयाच्या विऱ्याचा पुढे धबधबा कसा झाला किंवा खुटयाचा विरा कोठे गायब झाला, याबाबत ग्रामस्थांना प्रश्न पडताना दिसत नाही. 'राजधानी रायगड' या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथमाला क्र.24 मध्ये विष्णू वासुदेव जोशी लिखित या ग्रंथाला आव्हान देण्याची गरज ग्रामस्थांना वाटत नाही. केवळ येथेही ते सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या संशोधनाला तसेच त्यांना वैयक्तिक दोष देताना दिसत आहेत.
रामदासपठार येथील 'रामगंगा' धबधबा रामवेधी आकाराच्या 'आनंदवनभुवन'लगत
महाड ते पुणे महामार्गावर वरंध घाटामधून माझेरीजवळच्या कावळा किल्ल्याच्या मागे रामदासपठारकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सुंदरमठाकडे गेल्यानंतर तेथून काही मिनिटांच्या अंतरावर समर्थ रामदासस्वामींच्या आनंदवनभुवनालगतचा रामगंगा धबधबा समर्थभक्तांसह दर्शनाची पर्वणी ठरणार आहे. येथील गुप्तगंगेचे दर्शनही दासबोधातील वर्णनानुरूप आहे, याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शीना यानिमित्ताने येऊ शकेल. 'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासि तुळणा नाही। आनंदवनभुवनी।' या कडव्यामध्ये समर्थांनी आकाशातून लोटल्यासारख्या वाटणाऱ्या जलप्रपाताचे वर्णन केले आहे. या जलप्रपाताचे उगमस्थान नसल्याने लोटली असा शब्दप्रयोग केला आहे. हा जलप्रपात 'रामवेधी निरंतरी।' म्हणजेच येथे असलेल्या घळीचा आकार प्रवेशद्वारापासून अंतरभागापर्यंत रामाच्या धनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार आहे, या घळीच्या जवळचा हा जलप्रपात असलेला धबधबा आहे; म्हणून या धबधब्याला समर्थ 'रामगंगा' असे म्हणतात. गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे हा धबधबा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात असल्याने या धबधब्यास घळीच्या 'रामवेधी' आकारानुसार राम आणि जलप्रवाहाच्या दिशेनुसार गंगा असा 'रामगंगा' उल्लेख समर्थांनी केला आहे. या रामगंगा धबधब्याकडे पाहून या आनंदवनभुवन काव्यातील 'उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया। जप तप अनुष्ठाने। आनंदवनभुवनी।' या कडव्याची सार्थता येथे येणाऱ्यांस जाणवते. या धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे साधारणत: 35 फूट लांब आणि 19 फूट रूंदीचे सपाट कातळ दिसून येते. सुर्याचे दक्षिणायन सुरू होताना स्नानसंध्या, जप, तप आणि अनुष्ठाने तसेच पुरश्चरणं करण्यास समर्थ रामदासस्वामींना या रामगंगा धबधब्याच्या उदंड पाण्याचा उपयोग होत असल्याचा या कडव्याचा अर्थ येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांना नक्कीच अनुभवता येईल.
समर्थ प्रतापातील गिरीधरस्वामीलिखित उल्लेखानुसार तसेच 'समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन। मार्ग सोपान करूनी जावे॥ समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
सुंदरमठ म्हणजेच शिवथरची घळ असेही श्रीदासायनामध्ये म्हटले आहे. त्यानुसार रामदासपठार येथेच सुंदरमठ आणि परिसराचे पुरावे सिध्द झाले असून सुंदरमठाचाच भाग असलेली आनंदवनभुवन ही घळ म्हणजे शिवथरची घळ आहे. हे पुरावे पडताळून पाहण्यासाठी ग्रामस्थांनी इतिहास संशोधकांची मदत जरूर घ्यावी. परंतू, त्याबाबत आक्रस्ताळेपणा करून कोणताही पुरावा नसताना आमचीच घळ खरी असल्याचा दावा करून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांची वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन संप्रदायातर्फे करण्यात आले आहे. सर्वशृत शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांचे श्रीदासायन ग्रंथातील मत, हे वर्णन शिवथरचे कि चाफळचे? का दोन्ही ठिकाणे त्यात अभिप्रेत आहेत?अथवा आपणास अद्यापि माहिती नसलेल्या तिसऱ्या एका सुंदरमठाचे वर्णन यात आहे? असे सध्या शिवथरची घळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाबाबतची साशंकता नमूद करून पारचे रामवरदायिनीचे स्थान शिवथरला सन्निध नाही, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र, रामदासपठारावरील सुंदरमठाला पारचे रामवरदायिनीचे स्थान थेट सन्निध असल्याचे गुगलअर्थद्वारे स्पष्ट होत असल्याने अनेक पुराव्यांसह सिध्द झालेला हा सुंदरमठच खरा आणि तेथे संशोधनांती सिध्द झालेली आनंदवनभुवनी काव्यानुसारची घळ शिवथरची घळ असल्याने यासंपूर्ण प्रकरणी वाद न घालता संवाद साधण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच समर्थभक्तांना समर्थ रामदासस्वामी यांच्या सर्वग्रंथ लेखनाची खरी जागा असलेली शिवथरची घळ दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.
शैलेश पालकर.
पोलादपुर रायगड
९२२६८४९१८५/९८९०३२०१२७
nice work!!
ReplyDeleteGood collection of data which needs to be substantiated before something certain will surface!!
ReplyDeleteGood work Shailesh!!! Keep it up!
ReplyDeleteNamaskar,
ReplyDeleteVyavasthit mahitisah, puravyansaha dileli hi mahiti kharich vichar kanyayogya ahe. Vidvan , sujan nagarik, Itihas sanshodhak tasech Ramdas panthi ityadi sarvani ekatra basun yavar nit vichar karava va yogya nirnay ghyava ase vatate.
Veiyaktik bhavanela mahatva na deta Shri Ramdas Swaminchya vastavyane pavitra zalelya jagecha samasta lokana tyanchi bhakti vadhvinyasathi, Swaminchya nikatatecha anubhav ghenyasathi labh ghadla tar te far mothe karya tharnar ahe,
-Vivek Vatve
vrvatve@rediffmail.com
Nice information
ReplyDeleteNice information
ReplyDelete